
Nagraj Manjule Sairat Last Scene: २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला होता. मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे नवीन चेहरे दिले. या चित्रपटातील शेवटचा सीन सगळ्यात जास्त गाजला. या सीनमध्ये परशा आणि आर्चीचा लहान मुलगा रक्ताच्या पायाने चालताना दाखवलाय. तो सीन नेमका कसा शूट केला याबद्दल नागराज यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.