
'रॉकस्टार' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती तिच्या चित्रपट किंवा फोटोंमुळे चर्चेत नाहीये तर तिच्या बहिणीने केलेल्या हत्येमुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. नर्गिसची बहीण आलिया फाखरी हिच्यावर दोन व्यक्तींच्या हत्येचा आरोप आहे. आलियाने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड यांची जिवंत जाळून हत्या केल्याचा आरोप आहे. तिला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केलीये. ४३ वर्षीय आलियाने आग लावली त्यात त्यांचा जळून मृत्यू झालाय.