
सिनेसृष्टी हे असं क्षेत्र आहे ज्यात तुम्हाला सगळ्यात वर नेण्याची क्षमताही आहे आणि रसातळाला नेण्याची धमकही आहे. या क्षेत्रात असे अनेक मोठे कलाकार झाले जे एका रात्रीत रावचे रंक झाले. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आलीये. बंगाली चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सुमी हर चौधरी रस्त्यावर वाईट अवस्थेत भटकताना दिसली. जिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय. चित्रपट क्षेत्रातील ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून समोर आली आहे जिथे ती रस्त्याच्या कडेला भटकताना दिसली. तिची अवस्था अशी होती की तिला ओळखणे कठीण होते.