
मराठी सिनेसृष्टी ही जगात गाजणारी सिनेसृष्टी आहे. या सिनेसृष्टीने जगाला खरा अभिनय शिकवला. नाट्य कलाकारांनी प्रत्येक दृश्य जिवंत केलं. तर सिनेकलाकारांनी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणलं. गेल्या २० वर्षात नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी मराठी सिनेसृष्टीला असे काही उत्तम सिनेमे दिले की त्यांची जागा कुठलाही दाक्षिणात्य किंवा हिंदी सिनेमा घेऊ शकत नाही. उत्कृष्ट कथा, सुंदर दिग्दर्शन, दमदार कलाकार यासगळ्यांमुळे मराठी सिनेमा एकापेक्षा एक चांगले चित्रपट देत गेला. त्यातील एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. कोणता होता तो चित्रपट?