
2024 या वर्षाला निरोप देण्याची वेळ आता आलीये. हे वर्ष अनेक गोड-कडू आठवणींनी भरलेलं होतं. अनेक कलाकारांनी या वर्षी आपल्या जोडीदारासोबत साताजन्माची गाठ बांधली. तर अनेक स्टार्सचा जोडीदारासोबतचा बंध कायमचा तुटला आणि हे कलाकार घटस्फोटाच्या चौकटीत बंद झाले. या यादीतील काही नावं चाहत्यांना धक्का देणारी ठरली. घटस्फोट घेतलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत एआर रहमान-सायरा बानो, धनुष-ऐश्वर्यासह अनेक नावांचा समावेश आहे.