

BHUMIJA PATIL
esakal
मालिकांमधून नवनवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यातील काही चेहरे कायमचे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे 'नवरी मिळे हिटलरला' फेम भूमिजा पाटील. भूमिजा मालिकेत तीन सुनांपैकी एकीची भूमिका साकारलेली. याच मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. भूमिजाने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. साखरपुडा का मोडला याबद्दल सांगितलंय. सोबतच तिने जेव्हा हा निर्णय घरातल्यांना सांगितला तेव्हा त्यांची यावर काय प्रतिक्रिया होती हे देखील सांगितलं आहे.