
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिला साऊथची लेडी सुपरस्टार म्हटलं जातं. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. तिने निर्माता विघ्नेश शिवन याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलंही आहेत. मात्र नयनताराच्या वैयक्तिक आयुष्याची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगली. कधीकाळी ती अभिनेता प्रभुदेवा याला डेट करत होती. त्याच्यासाठी तिने चित्रपटही सोडले होते. आता एका मुलाखतीत तिने त्या दिवसांबद्दल सांगितलं आहे. तेव्हा मी प्रेमात होती असं ती म्हणालीये.