
मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक चित्रपट विभागाच्या वतीने एका शिष्टमंडळाने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. राज्यातील चित्रपटगृहांचे नूतनीकरण, पारंपरिक लोककलांचा विकास, चित्रनगरी प्रकल्प, चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग यासह अनेक मुद्द्यांवर या वेळी सविस्तर चर्चा झाली. मंत्री शेलार यांनी या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.