
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने अनेक हिट चित्रपटात काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकताच राज कपूर यांच्या १०० व्या जन्मदिनानिमित्त खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज कपूर यांचा चित्रपट दाखवण्यात आला. बॉलिवूडकरांनी हा सोहळ्याला झाडून हजेरी लावली. मात्र या सोहळ्यातील काही घटना सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. यातील नीतू कपूर आलिया भट्ट यांचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.