

neha pendse
esakal
Marathi Actress Neha Pendse: लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. नेहा जितकी तिच्या चित्रपटांसाठी चर्चेत असते तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिली. तिने 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सोबतच ती हिंदी मधील 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेतही झळकली. आता ती 'तिघी' या चित्रपटात दिसतेय. या चित्रपटात बहिणींच्या नात्यांमधील गुंतागुंत दाखवण्यात आलीये. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत नेहाने पहिल्यांदाच तिच्या सख्ख्या बहिणीविषयी भाष्य केलंय. त्यांच्यात फारसं जमत नसल्याचं ती बोललीये.