

NEHA PENDSE
ESAKAL
Marathi Actress Neha Pendse: आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे ही तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. नेहाने 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. ती सगळ्यात जास्त चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने शार्दूल बायस याच्याही लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आणि चाहत्यांना धक्का बसला. कारण शार्दूलचा आधी दोनदा घटस्फोट झाला होता. तेव्हा अनेकांनी नेहावर टीका केली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला याबद्दल विचारणा करण्यात आलीये.