

netflix deleted movies and show
esakal
नेटफ्लिक्स वापरकर्त्यांसाठी एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. नेटफ्लिक्स हे जगभरात वापरलं जाणारं एक लोकप्रिय ओटीटी माध्यम आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्याला नवीन वेब शो आणि सीरिज प्रदर्शित होत असतात. नवनवीन शो आणि चित्रपटांचा खजाना असलेला हा ओटीटी प्लॅटफॉर्म आता प्रेक्षकांना मोठा धक्का देणार आहे. किंबहुना आधीच दिलाय. आता नेटफ्लिक्सवरून तुमचे आवडते शो आणि चित्रपट काढून टाकण्यात येत आहेत. त्याची सुरुवातही झालीये.