

Stranger Things Season 5 Part 2
esakal
नेटफ्लिक्सवर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे 'स्ट्रेंजर थिंग्स'ची पाचव्या सीझनच्या दुसऱ्या पर्वाची. ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर २०२५ रोजी हा सिजन जगभरात प्रदर्शित झाला, तर भारतात तो २६ डिसेंबरपासून उपलब्ध झाला. महाराष्ट्रात तर ही मालिका गुगल ट्रेंड्सवर अव्वल स्थानी आहे. सस्पेंस आणि थराराची बादशाह समजली जाणारी ही वेब सीरिज ख्रिसमसच्या सुट्टीत चुकवू नये अशीच आहे.