atharva sudame
atharva sudameesakal

आम्हाला अक्कल शिकवू नको! नेटकऱ्यांपाठोपाठ ब्राम्हण महासंघही अथर्व सुदामेवर संतापला; असं त्याने नेमकं केलं तरी काय?

BRAHMIN MAHASANGH REACT ON ATHARVA SUDAME REEL: आपल्या नवनवीन रिल्समधून चाहत्यांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय रिलस्टार अथर्व सुदामे सध्या अडचणीत सापडल्याचं दिसतंय.
Published on

टिक टॉकनंतर असे अनेक रीलस्टार पुढे आले ज्यांनी आपल्या फॉलोवर्सना उत्तम कंटेन्ट देत सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. त्यांच्या कंटेन्टचं कायमच कौतुक होत आलं. त्यांचे हटके विषय आणि अभिनय यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. अशाच काही लोकप्रिय कंटेन्ट क्रिएटरपैकी एक म्हणजे अथर्व सुदामे. अथर्वच्या फॉलोवर्सची संख्या प्रचंड आहे. मात्र सध्या तो अडचणीत सापडला आहे. गणेशोत्सवानिमित्त केलेल्या एका व्हिडिओमुळे रोष सहन करावा लागतोय. आता त्यात ब्राम्हण महासंघाने देखील उडी घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com