
छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी चुणचुणीत, गोड, गोंडस बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. मायरा 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचली. प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबत दिसणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली. तिच्या गोंडस बोलण्यावर चाहते फिदा होते. मात्र तिच्या चित्रपट आणि मालिकांमुळे तिचं बालपण हरवलंय असं म्हणत मायराच्या आईवडिलांवर टीका होत आलीये. आता तिचा एक व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा नेटकरी तिच्या आई- वडिलांवर भडकले आहेत.