
Latest Bollywood News: लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' या चित्रपटाची सर्वत्र प्रचंड चर्चा होती. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. २२ जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र असं असताना चित्रपटाच्या ट्रेलरवरून नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून एक शब्द वगळल्याने आता नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.