

CONTROVERSIAL SCENE IN RIMJHIM CHOTI UMAR BADE SAPANE INVOLVING MINOR ACTRESS
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षक आवर्जून पाहतात. मग ते हिंदी प्रेक्षक असोत किंवा मराठी. या मालिकांमधील पात्र, ते कलाकार प्रेक्षकांचे आवडते असतात. मात्र जेव्हा मालिकेत काही चुकीचे सीन दाखवले जातात तेव्हा मात्र प्रेक्षक त्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. अशाच एका मालिकेतील सीनबद्दल सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय. या मालिकेत अल्पवयीन मुलीकडून नको ते सीन करून घेतल्याने आता सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे. या मालिकेतील नायिका फक्त १६ वर्षाची आहे. तर नायक २४ वर्षांचा आहे.