
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. काही प्रेक्षक तर मालिकेतील कलाकारांना आपल्या घरातील सदस्य समजतात. मात्र काही कारणास्तव कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर प्रेक्षकही अचंबित होतात. अशीच एक अनपेक्षित एक्झिट होती स्टार प्रवाहच्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेतील कलाकाराची. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच एका कलाकाराने या मालिकेचा निरोप घेतला. आता त्याच्याजागी एका नव्या कलाकाराची वर्णी लागली आहे.