
Entertainment News: छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही मालिका नव्याने भेटीला येणार आहेत. टीआरपीच्या यादीत सगळ्यात वर राहण्यासाठी आणि मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी सगळेच निर्माते जोर लावताना दिसतायत. त्यासाठी मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट आणण्यात येत आहेत. आता झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'पारू' मध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नव्या मेंबरची एंट्री होणार आहे. झी मराठीवरील जुनी अभिनेत्री नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही अभिनेत्री 'पारू' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
'पारू' मालिकेत सध्या कोणताही खलनायक नाहीयेत यापूर्वी भरत जाधव यांची एंट्री दाखवण्यात आली होती. मात्र काही काळाने त्यांचं पात्र संपवण्यात आलं. दिशा मालिकेत खलनायिका दाखवण्यात आली होती. मात्र तीदेखील साईड लाइन झाली. आता एक मुख्य खलनायिका मालिकेत दाखवण्यात येणार आहे. झी मराठीवर नायिका म्हणून झळकणारी अभिनेत्री आता मालिकेत खलनायिका म्हणून दिसणार आहे. ही अभिनेत्री आहे श्वेता खरात. 'मन झालं बाजींद' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात 'पारू' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.