
एक गर्भवती महिला आहे. तिला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. तिला वाटतं की हॉस्पिटलमधील लोकांनी तिच्या बाळाची अदलाबदली केली आहे. कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. पण तिचा नवरा, जो पूर्वी दारू पित होता, तो त्याच्या पत्नीवर विश्वास ठेवतो. या स्त्रीचं नाव दिव्या आहे आणि तिच्या नवऱ्याचं नाव आनंद आहे. दोघांनाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य ओझं मानतात. पर्सनॅलिटी डिसऑर्डरमुळे दिव्याचं लग्न मोठ्या मुश्किलीने झालंय. दोघांचाही भूतकाळ वेगळा आहे. पण बाळाची खरोखरच रुग्णालयात अदलाबदली झाली आहे का?