Incident of Godhra : गोध्राच्या घटनेवर नवा सिनेमा, रणवीर शौरी महत्त्वाच्या भूमिकेत..

२००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ‘चांद बुझ गया’, ‘परजानियां’, ‘फिराक’ यांसारखे चित्रपट आणि माहितीपट बनवले गेले आहेत.
Incident of Godhra
Incident of Godhrasakal
Updated on

२००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ‘चांद बुझ गया’, ‘परजानियां’, ‘फिराक’ यांसारखे चित्रपट आणि माहितीपट बनवले गेले आहेत.

या घटनेला २२ वर्षे होत आहेत. आता २२ वर्षांनंतर ‘अॅक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ हा चित्रपट बनला आहे, ज्याचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. आजही प्रेक्षकांना २००२ साल चांगलेच आठवत असेल.

गुजरातमधील या दुःखद घटनेतील बळींची खरी कहाणी १ मार्च २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर शौरी, पंकज जोशी सारखे प्रतिभावान कलाकार आहेत. या चित्रपटात रणवीर शौरीने एका वकिलाची भूमिका साकारली आहे, जो गोध्रा घटनेतील पीडितांच्या बाजूने लढताना दिसतो.

चित्रपटाचे दिग्दर्शन एम. के. शिवाक्ष यांनी केले आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्राहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत ५९ जणांचा मृत्यू झाला होता. चित्रपटाचा टीझर फार पूर्वी रिलीज झाला होता, पण ‘द केरला स्टोरी’च्या गोंगाटात त्याची फारशी चर्चा होऊ शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com