
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' मध्ये आता नवीन ट्विस्ट येणार आहे. गेले अनेक महिने ही मालिका टीआरपी यादीत टॉप ५ मध्ये आहे. मालिकेतील पात्र आणि प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांचा आवडता आहे. मात्र आता मालिकेत येणाऱ्या नवीन ट्विस्टवर प्रेक्षक संतापले आहेत. वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोनुसार जानकीवर पुन्हा संकट येणार आहे कारण ऐश्वर्याच्या हाती मोठं घबाड लागणार आहे. असं नेमकं काय घडणार?