
लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यातील वाद काही प्रेक्षकांना नवीन नाही. 'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या सीझनमध्ये या दोघींनी घर दणाणून सोडलं. निक्कीने अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत वर्षा यांचा अपमान केला. त्यावर वर्षा यांनी कधीही त्यांचा तोल ढळू दिला नाही. मात्र त्यादेखील अनेकदा निक्कीला टोचून बोलताना दिसल्या. आता बिग बॉसचा सिझन संपल्यावरही त्याच्यातील वैर काही संपायचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा निक्कीने वर्षा यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलंय.