
सध्या निलेश साबळे आणि शरद उपाध्ये यांचं प्रकरण चांगलंच गाजलं. 'चला हवा येऊ द्या' मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता निलेश साबळे याने आपल्या लेखनाने, अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेवर आरोप केले. तो गर्विष्ठ असल्याचे आरोप केले. त्यावर निलेशने देखील व्हिडिओ बनवत त्यांना सडेतोड उत्तर दिलं. आता एका मुलाखतीत निलेशने पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय. त्याने असं का झालं? उत्तर देणं का गरजेचं होतं? याबद्दल त्याने सांगितलंय.