

nishigandha wad daughter
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेत्री निशिगंधा वाद आणि अभिनेते दीपक देऊळकर यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. या जोडीने काही हिट चित्रपटात काम करत ९०चं दशक गाजवलंय. ते दोघे अजूनही मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसतात. दीपक देऊळकर आता स्क्रीनवर दिसत नसले तरी ते निर्माते म्हणून अनेक मालिका आणि चित्रपटांचं काम पाहतात. मात्र या जोडप्यासोबतच त्यांच्या लेकीचीदेखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगते. त्यांची मुलगी ईश्वरी देऊळकर हीदेखील आईवडिलांसारखी अभिनयक्षेत्रात येणार का यावर आता निशिगंधा यांनी उत्तर दिलंय.