

deepak deulkar
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेते दीपक देऊळकर यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीमधे स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांच्या दिसण्यावर आणि नृत्यावर अनेक तरुणी फिदा होत्या. ते लोकप्रिय अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे पती आहेत. त्यांनी 'लेक लाडकी या घरची', 'सपने साजन के', 'लेक लाडकी या घरची' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. 'कृष्णा' या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बलरामाची भूमिका साकारली होती. याच मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली. ते निर्मातेदेखील आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांना आलेला वाईट अनुभव सांगितलाय.