

nitish bhardwaj
esakal
छोट्या पडद्यावर असेल अनेक कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाच्या आणि पात्राच्या जोरावर घराघरात लोकप्रिय होतात. त्यांना त्यांच्या पात्राच्या नावाने ओळखलं जातं. असेच एक कलाकार म्हणजे अभिनेते नितीश भारद्वाज. नितीश यांनी रामानंद सागर यांच्या 'श्रीकृष्ण' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. नितीश यांनी स्मिता गाटे यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या १८ वर्षानंतर त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर एका मुलाखतीत नितीश यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.