
nivedita saraf
esakal
मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटातही काम केलंय. त्यांनी 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका' अशा अनेक चित्रपटात काम केलं. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. निवेदिता या अनेक मालिकांमधून आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या अनेक हिंदी सिनेमात देखील झळकल्यात. त्यांनी अनेक बड्या हिंदी कलाकारांसोबत देखील काम केलंय. त्यांनी 'किंग अंकल' या चित्रपटात अभिनेते जॅकी श्रॉफ आणि शाहरुख खान सोबत काम केलंय. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय.