

marathi movies
esakal
दिवाळी म्हटलं की, सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. घराघरांत फराळाची रेलचेल, बाजारपेठांमध्ये गर्दी आणि सुट्ट्यांमुळे मनोरंजनाची मेजवानी अनुभवण्याची संधी असते. याच काळात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतही नव्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची चढाओढ सुरू असते. अनेक निर्माते व दिग्दर्शक या सुट्टीचा फायदा घेण्यासाठी आपला चित्रपट प्रदर्शित करीत असतात. परंतु या वेळी मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या धामधुमीत मराठीसाठी शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे ठरणार आहे.