
लवकरच २०२४ सगळ्यांचा निरोप घेणार आहे. या वर्षाने कुणाला आनंद दिला तर कुणाला दुःख. कुणाला कडू आठवणी दिल्या तर कुणाला गोड. आता सरत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ झालीये. अशातच गूगलवर यावर्षी सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या टॉप वेब सीरिजची यादीही समोर आलीये. पाहूया या यादीत कोणती वेब सीरिज सगळ्यात वर आहे आणि कोणती खाली. यात पहिलं स्थान पटकावणाऱ्या सीरिजने 'मिर्झापूर' पासून 'पंचायत'ला देखील मागे टाकलंय.