
गेल्या २ महिन्यात छोट्या काही नवीन मालिकांची घोषणा झाली. टीआरपी यादीत वरचढ राहण्यासाठी झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्या नवनवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. त्यात झी मराठीवर तीन नवीन मालिका सुरू होणार आहेत. त्यातील १ कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या २' हा कार्यक्रम २६ जुलै पासून शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. मात्र त्यापाठोपाठ आणखी दोन मालिका सुरू होत आहेत ज्यासाठी झी मराठीवरील दोन मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे.