
अक्षरशः एक वर्षापूर्वी दिव्या खोसला हिने सावी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती, आणि हा चित्रपट तिच्या ऑन-स्क्रीन ट्रान्सफॉर्मेशनचं एक प्रभावी उदाहरण ठरला. आज या चित्रपटाच्या प्रदर्शानाला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि दिव्या या प्रोजेक्टचा उत्सव साजरा करत आहे — एक असा प्रोजेक्ट ज्याने तिची अभिनयक्षमता, सखोलता आणि जिद्द सगळ्यांसमोर आणली.अभिनय देव यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात दिव्याने एका गृहिणीची भूमिका साकारली, जी आपल्या पतीवर लावण्यात आलेल्या खोट्या खुनाच्या आरोपाविरोधात हार मानत नाही.