

o romio real story
ESAKAL
विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपट 'O' Romeo' सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही कथा हुसैन उस्तरा आणि सपना दीदी यांच्याभोवती फिरते. यात अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. सपना दीदीचं खरं नाव अशरफ होतं, जिच्या पतीची हत्या दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून करण्यात आली होती. पतीच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या जिद्दीने पेटलेली अशरफ, दाऊदचा कट्टर शत्रू आणि पोलिसांचा खबरी असलेल्या हुसैन उस्तराकडे पोहोचली. उस्तराने तिला शस्त्र चालवण्याचं आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिलं. याच काळात अशरफने 'सपना' हे नाव धारण केलं, कारण दाऊदला संपवणं हे तिचं एकमेव स्वप्न होतं.