

OTT TRENDING MOVIE
ESAKAL
ओटीटीच्या जगात गेल्या ३-४ दिवसांपासून एक आगळीवेगळी गोष्ट घडतेय. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक ॲक्शन ड्रामा चित्रपट अचानक ओटीटीवर ट्रेंड होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे IMDb रेटिंग केवळ ५.८ आहे, तरीही प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची चुरस लागली आहे. या चित्रपटात काजल अग्रवाल, 'पुष्पा २' फेम श्रीलीला आणि खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन रामपाल आहेत. मुख्य भूमिकेत साऊथचे सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण आहेत. चित्रपटाचे नाव आहे 'भगवंत केसरी', जो २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता.