

Prajakat Koli and Abhay Verma to Work in New OTT Web Series Operation Safed Sagar
sakal
Prajakta Koli New Web Series: भारतीय वायुसेनेच्या कारगिल युद्धावर आधारित ‘ऑपरेशन सफेद सागर’ या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेब मालिकेत ‘मुंज्या’फेम अभय वर्मा आणि मराठमोळी प्राजक्ता कोळी हे दोघेही पहिल्यांदाच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. अभय वर्माने गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेषतः ‘मुंज्या’नंतर त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. आता तो ‘ऑपरेशन सफेद सागर’च्या माध्यमातून नव्या कथानकाचा भाग बनला आहे.