
आपल्या अभिनयाने आणि स्टाइलने संपूर्ण बॉलिवूडला भुरळ घालणारे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आज टॉप अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी एक काळ गाजवलाय. मात्र त्यासाठी त्यांना खूप खडतर प्रवास करावा लागला. त्यांच्या आयुष्यातली ३३ वर्ष त्यांनी चाळीत काढली. मुंबईतल्या एका चाळीत त्यांचं बालपण गेलं. यश मिळाल्यानंतरही ते त्याच चाळीत राहिले. अनेक कलाकार त्यांना भेटायला त्या चाळीत यायचे. आजही ते त्या चाळीला भेट देतात. आता त्यांनी ज्या चाळीतल्या खोलीत ते राहायचे ती खोली भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केलीये. मात्र मालक ती खोली देण्यास तयार नाहीये.