
छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरतात. या मालिका टीआरपीमध्येही टॉप ठरतात. झी मराठीवरील पारू मालिका देखील अशीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. मालिकेतील पारू आणि आदित्य यांच्या लग्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता प्रेक्षकांना यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीये. अखेर पारू आणि आदित्य यांचं लग्न होणार आहे. मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे.