
'पद्मश्री’ ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. याकरिता हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२५-२०२६ म्हणून साजरं केलं जाणार आहे. या जन्मशताब्दीचे औचित्य साधत आयोजित एका विशेष कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांचा सन्मान सुप्रसिद्ध तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. तुळशी वृंदावनचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत अत्यंत प्रतिष्ठेचा 'माणिक रत्न' पुरस्कार अश्विनी भिडे-देशपांडे यांना याप्रसंगी प्रदान करण्यात आला. वंदना गुप्ते, भारती आचरेकर,अरुणा जयप्रकाश, राणी वर्मा आणि चौरंगचे अशॊक हांडे यावेळी मंचावर उपस्थित होते.