
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. त्याच वेळी अनुपम खेर यांनी हिंदूंच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. रवीना टंडन, संजय दत्त, गीतकार मनोज मुंतशीर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.