
Aditi Govitrikar Divorce : हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये गाजणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अदिती गोवित्रीकर सोशल मीडियावर सक्रीय असते. ती सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. मात्र सध्या अदिती तिच्या सिनेमामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अदितीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. एकदा त्याच्यासोबत बसून सगळं बोलायचं आहे असं ती म्हणालीये.