
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनचा ग्रँड फिनाले सोहळा काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय. सध्या घरात आहेत ७ सदस्य आणि यापैकी यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलय. त्यातच नुकतच विनोदवीर म्हणून लोकप्रिय असलेले पॅडी दादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे हे एलिमिनेशनमुळे घराबाहेर पडले. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर पंढरीनाथ यांनी सकाळ माध्यमासोबत संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकलाय.