Sunil Sukthankar : समांतर सिनेमांची चळवळ तशी जुनीच : सुकथनकर
Ajintha Verul Film Festival 2025 : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी समांतर चित्रपटाची परंपरा जुनीच असल्याचे सांगितले. समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट दोन्ही सामाजिक उद्दिष्ट साधतात, असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर : ‘‘समांतर चित्रपट किंवा व्यावसायिक चित्रपट हे दोन्ही सामाजिकच असतात. दोघांची शैली वेगळी असते. समांतर सिनेमे हे वेगळ्या धाटणीचे, सोपे व सहज मांडण्याचा प्रयत्न होतो.