
बॉलिवूडच्या गाजलेल्या फ्रॅन्चायजी सिनेमांपैकी एक असलेली फ्रॅन्चायजी म्हणजे 'हेरा फेरी'. बाबू भैया, राजू आणि श्याम यांचं त्रिकुट चित्रपटात जो काही गोंधळ घालतं, ते पाहायला प्रेक्षकांना प्रचंड धमाल आली होती. आजही 'हेरा फेरी' हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. काही महिन्यांपूर्वीच 'हेरा फेरी ३' ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सगळ्यात आधी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे त्रिकुट आलं. मात्र आता परेश रावल हे या सिनेमाचा भाग नसल्याचं समजतंय. परेश यांनी या सिनेमासाठी नकार दिलाय.