
गेल्या काही महिन्यांपासून 'हेरा फेरी ३' बद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. 'हेरा फेरी' ही फ्रॅन्चायजी प्रेक्षकांच्या आवडत्या फ्रॅन्चायजीपैकी एक आहे. या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसरवर धुमाकूळ घातलेला. आता या फ्रॅन्चायजीचा तिसरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यातदेखील अक्षय-परेश-सुनील हे तिघे धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. मात्र यापूर्वी चित्रपट कार्तिक आर्यनला घेण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता परेश रावल यांनी यावर भाष्य केलं आहे.