Viral Video : खुद्द श्रीवल्लीने केलं पारू टीमच्या डान्सचं कौतुक ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

Paru serial cast 'Angaro' dance went viral : झी मराठीवरील 'पारू' या मालिकेच्या टीमने केलेल्या डान्सचं खुद्द श्रीवल्लीने कौतुक केलं.
Paru
ParuEsakal

Zee Marathi : झी मराठीवरील 'पारू' ही मालिका सध्या खूप गाजतेय. या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स गाजतातच पण याबरोबरच या टीमचे सोशल मीडियावरील रील्सही सोशल मीडियावर लोकप्रिय होतात. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या एका गाण्यावर डान्स केला आणि तो डान्स चांगलाच व्हायरल झालाय.

Paru
Pushpa 2: 'पुष्पा-2'मध्ये समंथा नाही तर 'ही' अभिनेत्री करणार आयटम साँगवर डान्स? चर्चांना उधाण

'पुष्पा २' वर डान्स आणि श्रीवल्लीची कमेंट

सध्या 'पुष्पा २' सिनेमातील अंगारो हे गाणं ट्रेंड मध्ये आहे. या गाण्यावर 'पारू' मालिकेतील प्रसाद जवादे, शरयू सोनावणे, पूर्वा पवार या कलाकारांनी भन्नाट डान्स केला. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओवर 'पुष्पा २' सिनेमातील श्रीवल्ली म्हणजे रश्मिका मंदानाने हार्ट इमोजी शेअर करत या टीमचं कौतुक केलं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून खुद्द 'पारू 'मालिकेच्या कलाकारांनीही रश्मिकाचे आभार मानले. तर चाहत्यांनीही पारू टीमच्या डान्सचं कौतुक केलं. तर अनेकांनी रश्मिकाने 'पारू' टीमचं केलेल कौतुक बघून तिच्या या साधेपणासाठी कौतुक केलं आहे. तर 'अंगारो' हे गाणं गायिका श्रेया घोषालने गायलं आहे.

'पुष्पा २' ची चर्चा

१५ ऑगस्ट २०२४ ला 'पुष्पा २' रिलीज होतेय. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासीलची मुख्य भूमिका आहेत. या बरोबरच यावेळी सिनेमातील आयटम सॉन्गमध्ये तृप्ती डिमरी झळकणार असल्याची चर्चा आहे.

'पुष्पा पुष्पा' हे सिनेमाचं टायटल ट्रॅकही सोशल मीडियावर गाजलं. गोल्डन कलरचे हायलाईट्स, सिल्कचे प्रिंटेड शर्ट्स, पँट्स, गळ्यात हातात दागिने आणि क्लासिक शूज अशा वेगळ्या अंदाजात आता पुष्पा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय पुष्पाचं चिन्हही यावेळी गाण्यात दाखवण्यात आलं. हाताचा उलटा पंजा ही पुष्पाची निशाणी आणि त्याच्या गँगचा झेंडा याची झलक या गाण्यात पाहायला मिळाली.

या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनच्या भूमिकेला आवाज दिला आहे. या आधी त्याने 'पुष्पा'च्या पहिल्या भागातही श्रेयसने आवाज दिला होता.

Paru
Pushpa 2 New Song : 'अंगारो-द कपल साँग' वर थिरकले रश्मिका-अल्लू अर्जुन; BTS व्हिडीओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com