पारंपरिक लोककलांमध्ये अडकलेल्या स्त्रीच्या अस्तित्त्वाचा जिवंत दस्तावेज; 'फुला' येतेय भेटीला

PHULA MARATHI MOVIE RELEASE DATE: तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते.
phula

phula

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीत लावणी आणि तमाशावर अनेक चित्रपट बनले. आता असाच एक अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा सांगणारा 'फुला' चित्रपट मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थितीत होती. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com