
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट ‘फुले’ येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटात क्रांतिकारी दाम्पत्याच्या स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.