
MAYURI WAGH VS SURUCHI ADARKAR
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने तिचा पती आणि अभिनेता पियुष रानडे याच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. मयुरी पियुषची दुसरी पत्नी होती. त्याने आपल्याला फसवलं असल्याचं तिने सांगितलंय. त्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला असं ती म्हणालीये. शेवटी वडिलांना वाईट बोलल्यानंतर मात्र मयुरीने सगळं संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र पियुषची तिसरी पत्नी सुरुची आडारकर त्याच्याशी लग्न केल्यनानंतर काहीतरी वेगळंच म्हणाली होती. तिने आधीची दोन लग्न तुटण्यावर पियुषची बाजू घेतली होती.