
Entertainment News : अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्रा येथील घरात चोरीचा प्रयत्न झाला. त्यात अभिनेत्यावर त्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. या प्रकरणी सकाळी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. त्याची चौकशी करण्यात येत होती. मात्र आता हा व्यक्ती कुणीतरी दुसराच असल्याचं कळतंय.