Raveena Tandon : 'रवीनाने मारहाण केली नाही' पोलिसांचा खुलासा, तक्रार करणाऱ्या कुटूंबाची केली पोलखोल

Raveena Tandon Case : अभिनेत्री रवीना टंडनने वृद्ध महिलेला मारहाण केली नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केलाय.
Raveena Tandon
Raveena TandonEsakal

Mumbai : अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon) हिने परवा रात्री म्हणजेच एक जूनला रस्त्यावर चालणाऱ्या तीन महिलांना दारू पिऊन मारहाण केल्याच्या बातमीने सगळीकडे खळबळ झाली होती पण आता याबाबत पोलिसांनी खुलासा केला असून रवीनाने आणि तिच्या ड्रायव्हरने दारू प्यायली नसल्याचं त्यांनी उघड केलंय. तर व्हिडिओमध्ये रवीनाला आणि तिच्या ड्रायव्हरला धक्काबुक्की करणारं कुटुंब हे खोटे आरोप करत असल्याचे पोलिसांनी म्हटलं. पोलिसांच्या या खुलास्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय.

Raveena Tandon
Viral Video: रवीना टंडनचा दारु पिऊन धिंगाणा? वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप; व्हिडिओ होतोय व्हायरल

नेमकं काय आहे प्रकरण ?

एका कुटूंबाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत रवीना आणि तिच्या ड्रायव्हरने दारूच्या नशेत त्यांच्या आईला आणि बहिणीला मारहाण केल्याचा दावा केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

जखमी कुटुंबाने व्हिडिओद्वारे प्रवीण आणि दारूच्या नशेत तिच्या ड्रायव्हरच्या मदतीने तीन महिलांना मारल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाने केला होता. तीन महिला आणि एक माणूस रस्त्याने चालत असताना रवीनाच्या ड्रायव्हरच्या गाडीचा धक्का एका महिलेला बसला आणि ती जखमी झाली असे या कुटुंबाचे म्हंटल होतं. आणि जेव्हा त्याला जाब विचारला तेव्हा त्याने उतरून मारहाण केली आणि त्यानंतर तिकडे रवीनाही आली आणि तिनेही मारहाण केल्याचा दावा या कुटुंबाने केला होता पण पोलीस तपासाअंती असं काहीही नसल्याचे स्पष्ट झाले

सीसीटीव्ही फुटेजने केला खुलासा

पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्याच्यात रवीनाचा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेऊन सोसायटीमध्ये नेत होता तर संबंधित कुटुंब रस्त्याने चालत होतं. त्यानंतर या कुटुंबाने गाडी थांबवली आणि ड्रायव्हरला गाडी रिव्हर्स घेताना मागे बघत जाण्यावरून ओरडू लागले. त्यामध्ये त्यांच्यात वाद झाला असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं.

तेव्हाच रविना तिथे बाहेर आली आणि आणि तेव्हाच या कुटुंबाने रवीनाच्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली. तेव्हा त्याला मारू नये म्हणून ती मध्ये पडली असं पोलिसांनी सांगितलं.

पोलीस म्हणाले...

झोन ९ चे पोलीस अधिकारी डीसीपी राजतिलक रोशन यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं कि,"त्यांनी व्हिडिओमध्ये खोटी तक्रार केलीये. आम्ही सगळं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि आम्हाला दिसलं कि अभिनेत्रीचा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेऊन सोसायटीमध्ये जात होता आणि संबंधित कुटूंब त्याच रस्त्याने चालत होतं. त्या कुटूंबाने ती अगदी थांबवली आणि त्या ड्रायव्हरला रिव्हर्स घेताना मागे कुणी आहे कि नाही हे तपासत जा असं सांगितलं. त्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. वाद वाढल्यावर ते केमेकांना शिवीगाळ करू लागले. तेव्हाच रवीना तिथे आली आणि गर्दीपासून तिच्या ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर दोन्ही तक्रारकर्ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या आणि नंतर एक पात्र लिहून त्यांना कोणतीही केस करायची नाही म्हणत तक्रारी मागे घेतल्या.

या प्रकरणात कुणीही जखमी झालं नसून कारलाही कोणतीही हानी झाली नाहीये. तर अभिनेत्री किंवा ड्रायव्हरने दारू प्यायली नव्हती. "

Raveena Tandon
Raveena Tandon : कधी सवतीवर फेकलाय ज्यूस तर कधी मुलाला हाकललं सेटवरून ; या आधीही रवीनाने रागाच्या भरात केलाय तमाशा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com